Maharashtra Covid -19:  आठवड्याभरात कोरोनाचे 812 नवे रूग्ण, मुंबई-पुण्यात काय परिस्थिती?

Maharashtra Covid -19: आठवड्याभरात कोरोनाचे 812 नवे रूग्ण, मुंबई-पुण्यात काय परिस्थिती?

| Updated on: May 28, 2025 | 9:39 AM

काही भागांत कोरोना बाधितांची संख्या वाढली पण साथ पसरण्याची शक्यता नाही, असं कोरोना रूग्ण वाढीवर वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संदर्भात एक अपडेट आहे. महाराष्ट्रात आठवड्याभरात कोरोना संसर्ग झाल्याचे तब्बल 812 नवीन रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात सर्वाधिक पाच रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. यासह मुंबईतही कोरोना संसर्गचा प्रसार होत असल्याचे पाहायला मिळतंय. मुंबईत सर्वाधिक 31 तर पुण्यात 18 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, देशात कोरोना व्हायसरमुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 72 सक्रिय रूग्ण असल्याची माहिती मिळत आहे. देशासह राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याच्या रुग्णांची संख्या वाढली असली तरी घाबरण्याचं काही कारण नसल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे. कोरोना रूग्ण वाढीच्या प्रश्नावर वैद्यकीय तज्ज्ञांची ही प्रतिक्रिया आहे तर कोरोना तपासारखा सामान्य असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

Published on: May 28, 2025 09:35 AM