Prakash Abitkar : घाबरून न जाऊ नका, लोकांना पॅनिक करू नका – आरोग्यमंत्री अबिटकर
Corona Virus in Maharashtra : राज्यातल्या वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आज आरोग्यमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा कोरोनाची लाट येणार का? पुन्हा लॉकडाउन लागणार का? अशी भीती नागरिकांना वाटत आहे. देशातल्या वाढत्या कोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्रातल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज या संपूर्ण परिस्थितीचा आढावा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी घेतला. आढावा बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना मंत्री अबिटकर म्हणाले की, ‘ नागरिकांना माझी विनंती आहे, की त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. जे आजारी लोक आहेत त्यांनी थोडी जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. लोकांना पॅनिक करू नका, थोडं शांततेनं स्वतःची काळजी घ्या. याच सूचना केंद्र सरकारनेही दिल्या आहेत. जळगावमधल्या घटनेबद्दल चौकशी करतोय, आमच्या यंत्रणेला योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे. राज्यातील सगळ्या नागरिकांना आवश्यक ती आणि चांगली आरोग्यसेवा मिळावी हाच आमचा प्रयत्न आहे, असं त्यांनी सांगितलं.
