India’s Got Latent Show वादाच्या भोवऱ्यात, सायबर विभागानं थेट सांगितलं; ‘…तर स्पर्धकांनही आरोपी करा’
कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता आणि नात्यांच्या साऱ्या मर्यादा तोडणारा इंडियाज गॉट लेलेंट हा शो वादात आला आहे. युट्युबर रणवीर अल्लाहाबादिया याने त्या शोमध्ये आई-वडिलांबद्दल अतिशय अक्षम्य विधान केल्यानंतर संताप उसळला आहे.
कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कार्यक्रमात आई-वडिलांसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे या शोवर सर्वच स्तरांतून नाराजी व्यक्त होत आहे. या शोमध्ये समय रैना सोबतच इतर परीक्षकांवरही कारवाई करण्यात आलेली आहे. या शोमध्ये प्रसिद्ध युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाने एका स्पर्धकाला आईवडिलांच्या संभोगाबद्दल अत्यंज आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. त्यामूळे सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. तर ‘इंडियाज गॉट लेटेंट’ च्या स्पर्धकांना देखील आरोपी करण्याची तयारी सुरू आहे. याच दरम्यान अश्लील टिपणी कोणत्याही स्पर्धकांनी केली असल्यास त्यांचावर तक्रार दाखल करून त्यांना देखील आरोपी करा, असं स्पष्टीकरण समय रैनाच्या शोबाबत सायबर विभागाकडून देण्यात आले आहे. वादग्रस्त वक्तव्याबाबत दरम्यान, रणवीर अलाहबादिया आणि रैनाविरोधात गुन्हा करण्यात आला. ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे आतापर्यंत एकूण 18 भाग युट्यूबवर प्रसिद्ध करण्यात आले होते. हे सर्व भाग हटविण्याबाबत युट्यूबला पत्र पाठविण्यात आल्याचं सायबर विभागाने सांगितलंय. तसंच प्रेक्षकांना यात साक्षीदार केलं जाणार असल्याचंही सायबर विभागाकडून सांगण्यात आलंय.
