Crowd at Juhu Beach | नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईतल्या जुहू चौपाटीवर नागरिकांची गर्दी
मावळतीच्या सूर्यासह सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांसह बाहेरच्या पर्यटकांनी जुहू चौपाटी(Juhu Beach)वर गर्दी केली होती. दरम्यान, नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, चौपाट्यांवर गर्दी करू नये, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय.
कोरोना(Corona)चे निर्बंध राज्यभरात लागू झालेत. त्या पार्श्वभूमीवर नववर्षाचं स्वागत करताना खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्यात. मावळतीच्या सूर्यासह सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांसह बाहेरच्या पर्यटकांनी जुहू चौपाटी(Juhu Beach)वर गर्दी केली होती. मुंबईत कलम 144 लागू आहे. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी, चौपाट्यांवर गर्दी करू नये, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलंय.
Published on: Dec 31, 2021 06:56 PM
