इयत्ता पहिली, दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार, शालेय शिक्षण मंत्री Varsha Gaikwad यांची माहिती

| Updated on: Jan 22, 2022 | 4:27 PM

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. वर्षा गायकवाड यांनी नाशिक येथे बोलताना येणाऱ्या काळात पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम (Syllabus Change) बदलणार असल्याची माहिती दिली.

Follow us on

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. वर्षा गायकवाड यांनी नाशिक येथे बोलताना येणाऱ्या काळात पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम (Syllabus Change) बदलणार असल्याची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या (CBSE) धर्तीवर झेडपी च्या शाळांमधून शिक्षण देणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या. वर्षा गायकवाड यांनी महापुरुषांच्या नावांवरुन करण्यात येणाऱ्या वादावर देखील भाष्य केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस,महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाववरून बाद निर्माण केला जातो, त्यामुळे मुलांना थोर पुरुषाच्या इतिहासाची ओळख करून दिली जाणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या. दुसरीकडे ग्लोबल पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेत जाण्यासाठी आवश्यक असणारी रजा मंजूर करण्याचे आदेश वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. पहिली दुसरीच्या अभ्यासक्रमातील बदलानंतर नवा अभ्यासक्रम कसा असेल हे पाहावं लागणार आहे.