cm eknath shinde : कटआऊट्स वॉर, शिवसेना भवनासमोरील मुख्यमंत्री शिंदे यांचे कटआऊट्स हटवले

cm eknath shinde : कटआऊट्स वॉर, शिवसेना भवनासमोरील मुख्यमंत्री शिंदे यांचे कटआऊट्स हटवले

| Updated on: Jan 18, 2023 | 10:21 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येत आहेत. भाजप आणि शिंदे गटाने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली असून मुंबईत मोठमोठे बॅनर्स आणि कटआऊट्स लावण्यात आले आहेत.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM NARENDRA MODI ) यांच्या स्वागतासाठी भाजप ( BJP ) आणि शिंदे गटाने ( SHINDE GROUP ) मोठी तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी सुमारे दीड लाख लोक जमा करण्याचा प्रयत्न आहे. कार्यकर्त्यांनी या सभेला मोठया प्रमाणात उपस्थित रहावे यासाठी तयारी करण्यात येत आहे.

भाजप आणि शिंदे गटाने मुंबईत मोठमोठे बॅनर्स आणि कटआऊट्स लावले आहेत. दादर येथील शिवसेनेचे मुख्यालय असलेल्या शिवसेना भवन येथेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे कटआऊट्स लावण्यात आले आहेत.

मात्र, मुंबई महापालिकेने हे सर्व कटआऊट्स काढून टाकले आहेत. या कटआऊट्समुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्यामुळेच हे कटआऊट्स हटविण्यात आल्याची माहिती मिळतेय. दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत आता तेजस ठाकरे यांचाही फोटो झळकत आहे.

Published on: Jan 18, 2023 10:21 AM