भरती परीक्षेच्या घोटाळ्यात आणखी आरोपींचा शोध सायबर पोलिसांकडून सुरु

भरती परीक्षेच्या घोटाळ्यात आणखी आरोपींचा शोध सायबर पोलिसांकडून सुरु

| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 7:47 PM

आरोग्य भरतीतील गट क आणि गट ड च्या परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या घोटाळ्यातील आरोपींचा पोलीस शोध घेत पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे. या 20  आरोपींच्या विरोधात पोलिसांनी हे चार्जशीट दाखल केल आहे.

पुणे – आरोग्य भरती परीक्षा घोटाळा प्रकरणातील (Health Recruitment Paper scam )आरोपीच्या विरोधात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं (Pune cyber police ) दोषारोपपत्र दाखल केलं आहे. शिवाजीनगर न्यायालयात (Shivajinagar Court)हे तब्बल 3 हजार 800 पानांच चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. आरोग्य भरतीतील गट क आणि गट ड च्या परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या घोटाळ्यातील आरोपींचा पोलीस शोध घेत पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे. या 20  आरोपींच्या विरोधात पोलिसांनी हे चार्जशीट दाखल केल आहे. यामध्ये आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले  मुख्य आरोपी आहे.