Ajit Pawar Video : ‘आम्ही दोघे सगळ्यांना उडवून टाकू, तुम्ही महायुतीच्या बातम्या…’, बघा दादांचा पत्रकारांसमोर मिश्किल संवाद
पुण्यातील चाकण नाणेकरवाडी येथे अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल आणि लघु शस्त्रास्त्र निर्मिती सुविधेचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.
पुण्याच्या चाकण येथील औद्योगिक वसाहतीमधील निबे लिमिटेड मिसाईल्स कॉम्प्लेक्स अँड प्रिसिजन मशीनिंगच्या अत्याधुनिक मिसाईल्स अँड स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्टेन गन हातात घेतल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर यावेळी अजित पवार यांनी पत्रकारांसोबत मिश्किल संवाद साधला. ‘आम्ही दोघे तर सगळ्यांना उडवून टाकू’, असं अजित पवार म्हणाले. नीट महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर बघा.. असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांसमोर मिश्कील भाष्य करत काहिसा संवाद साधला. बघा व्हिडीओ
