Ajit Pawar : अजित पवार शपथ विसरले का? मतदारांनाच थेट ‘निधी’वरुन धमकी, नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar : अजित पवार शपथ विसरले का? मतदारांनाच थेट ‘निधी’वरुन धमकी, नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Nov 22, 2025 | 10:17 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारात मतदारांना मतांमध्ये कात्री लावली तर निधीला कात्री लावणार असा इशारा दिल्याने वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ विसरली का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अंबादास दानवेंनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना निधीवरून धमकी दिल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांनी मतदारांना मतांमध्ये कात्री लावली तर निधीला कात्री लावणार असा दम भरल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना भेदभाव न करता सर्वांना न्याय देण्याचे वचन दिले होते, मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे ते ही शपथ विसरले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बारामतीमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की, जर तुम्ही सर्व अठरा उमेदवार निवडून दिले तर मी तुम्हाला सर्व विकास कामे करून देईन आणि माझ्याकडे चौदाशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. परंतु, जर मतांमध्ये काठ मारली, तर निधीलाही काठ मारणार असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. अंबादास दानवे यांनी यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

Published on: Nov 22, 2025 10:17 PM