Guillain-Barre Syndrome Video : गुइलेन बॅरे सिंड्रोमनं घेतला पहिला बळी; पुण्यात रूग्ण संख्या 73, अजितदादांची माहिती काय?

Guillain-Barre Syndrome Video : गुइलेन बॅरे सिंड्रोमनं घेतला पहिला बळी; पुण्यात रूग्ण संख्या 73, अजितदादांची माहिती काय?

| Updated on: Jan 26, 2025 | 2:18 PM

पुण्यामध्ये गुइलेनबॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 73 वर पोहचली आहे. यामधील काहींची प्रकृती गंभीर असल्याचीही माहिती समोर आली आहे. या आजारामुळे पुणे महानगर पालिका अलर्ट मोडवर असून उपाययोजना करत आहे.

पुणे शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोम या नव्या आजाराचं थैमान सुरू असताना चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोमनं पहिला बळी घेतला आहे. पुण्यातील DSK विश्व मध्ये राहणाऱ्या तरुणाचा गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजेच GBS ची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तो तरूण मूळचा सोलापूरचा असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराचे बाधित रूग्ण समोर येत आहे. हा तरूण डीएसके विश्वमध्ये वास्तव्यास होता. तो मूळचा सोलापूरचा होता, पण काही काळापासून पुण्यात रहात होता. या तरुणाला या सिंड्रोम आजाराची लागण झाली होती. तर त्याची तब्येत खालावल्याने त्याला सोलापूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं. त्यानंतर तो तरूण बरा होऊन काहीच दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागातून बाहेरही आला होता. पण त्याला परत श्वासनाचा त्रास झाल्याने त्या तरूणाचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दरम्यान पुण्यामध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 73 वर पोहचली असून त्यापैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. चिंताजनक म्हणजे मुंबईत गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रूग्णांची नोंद झाली आहे. GBS रुग्णांसाठी 50 बेड तर 15 आय सी यू बेड हे कमला नेहरू रुग्णालयात आरक्षित करण्यात आले असून या हॉस्पिटलला मोफत उपचार देण्यात येणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Published on: Jan 26, 2025 02:17 PM