Parth Pawar Land Deal : तो त्रास मी सहन केला, माझ्यावर 70 हजार कोटींचा आरोप, धाडी टाकल्या पण.. दादा नेमकं काय म्हणाले?

Parth Pawar Land Deal : तो त्रास मी सहन केला, माझ्यावर 70 हजार कोटींचा आरोप, धाडी टाकल्या पण.. दादा नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Nov 10, 2025 | 12:27 PM

पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणावरही चर्चा सुरू आहे. अशातच अजित पवारांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली, तर मनोज जरांगे यांच्यावरील कथित कटामुळे शिरूर कासार बंदची हाक आहे.

अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर झालेल्या 70 हजार कोटींच्या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर धाडी टाकण्यात आल्या, नातेवाईकांना त्रास दिला गेला, पण मी ते सहन केले, असे अजित पवार म्हणाले. मला 100 कोटी रुपये देऊन बाकीचे पैसे ठेवण्याचा त्यांनी उपरोधिक सल्ला दिला.  दुसरीकडे,  पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणही चर्चेत आहे. हा व्यवहार रद्द झाल्यास 42 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कंपनीच्या कमी भागभांडवलाच्या पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Published on: Nov 10, 2025 12:27 PM