Ajit Pawar : म्हणून मला इथं यावं लागत, तुम्ही काम करत नाही; अजितदादांच्या कुणाला कानपिचक्या?
उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वातंत्र्य दिनानिमित्त बीडमध्ये होते. यावेळी, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकांची निवेदने स्वीकारली. तर दुसरीकडे योगेश क्षीरसागर यांना कानपिचक्या दिल्या.
भारताचा आज 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत ध्वजारोहण संपन्न झाले. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड शहरात ध्वजारोहण केले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार हे आज स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणासाठी बीडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनेकांचे निवेदने स्वीकारले. या दरम्यान बीड विधानसभेचे राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांना झापले. तुम्ही काही काम करत नाही.. म्हणून मला इथे यावं लागतं, असे म्हणत अजित पवार यांनी योगेश क्षीरसागर यांना कानपिचक्या दिल्यात.
Published on: Aug 15, 2025 08:15 PM
