Devendra Fadnavis Video : ‘अंदर की बात है…’, विरोधकांच्या घोषणाबाजीवर देवेंद्र फडणवीसांचा मिश्कील टोला
सध्या मुंबईत विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी होताना दिसतेय. अशातच देवेंद्र फडणवीस बोलत असताना अनिल परब यांनी मोठ मोठ्याने घोषणाबाजी केली.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना विरोधातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते अनिल परब यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहात ‘अंदर की बात है… मनिषा कायंदे भी हमारे साथ है.. ‘, असं अनिल परब म्हणाले. दरम्यान, सभागृहात अनिल परब यांनी केलेल्या घोषणेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. ‘अरे… अंदर की बात है… पर तुम सब लोक हमारे साथ है..’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पुढे देवेंद्र फडणवीस असेही म्हणाले, आप सब लोक हमारे साथ है.. मी पण तुमच्या सोबत असल्याचे त्यांनी मिश्किलपणे म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी अनिल परब यांनी केलेल्या घोषणाबाजीवर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. बघा पूर्ण व्हिडीओ…
Published on: Mar 19, 2025 04:11 PM
