Eknath Shinde Call Raut : लवकर बरे व्हा… शिंदेंकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस, थेट सुनील राऊतांना केला फोन अन्…

Eknath Shinde Call Raut : लवकर बरे व्हा… शिंदेंकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस, थेट सुनील राऊतांना केला फोन अन्…

| Updated on: Nov 11, 2025 | 4:42 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. रुग्णालयातून नुकताच डिस्चार्ज मिळाल्यानंतर शिंदेंनी संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करून लवकर बरे व्हा असा निरोप दिला. याआधी देवेंद्र फडणवीस यांनीही राऊतांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. संजय राऊत यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. ‘लवकर बरे व्हा’ असा निरोप शिंदे यांनी सुनील राऊत यांच्यामार्फत संजय राऊत यांना दिला आहे.

गेल्या आठवड्यात संजय राऊत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज एकनाथ शिंदेंनी त्यांची विचारपूस केली. शिंदे यांनी सुनील राऊत यांना आराम करण्याचा सल्लाही दिला. यापूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊत यांच्या तब्येतीची फोनवरून विचारपूस केली होती. संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते, याबाबत त्यांनी एक पत्रकही काढले होते.

Published on: Nov 11, 2025 04:42 PM