Eknath Shinde Video : भैय्याजी जोशींच्या विधानावरून राज्यात गदारोळ, शिंदे स्पष्टच म्हणाले, ‘मराठीचा अपमान…’

Eknath Shinde Video : भैय्याजी जोशींच्या विधानावरून राज्यात गदारोळ, शिंदे स्पष्टच म्हणाले, ‘मराठीचा अपमान…’

| Updated on: Mar 06, 2025 | 6:07 PM

“मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या परिसरात विविध भाषा बोलल्या जातात.  मुंबईत येणार्‍या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही.” असे वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केलं होतं. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैय्याजी जोशींनी मराठी भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर विरोधक भाजपवर चांगलेच ताशेरे ओढत असल्याचे पाहायला मिळत आहे. “मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या परिसरात विविध भाषा बोलल्या जातात.  मुंबईत येणार्‍या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही.” असे वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केलं होतं. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.  भैय्याजी जोशी यांनी मराठीचा अपमान केला नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी म्हटलंय. भैय्याजी जोशींनी मराठीला दुय्यम समजलेलं नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणतायत. काही लोक राजकारण करतात त्यांनी आता राजकारण थांबवावं असं एकनाथ शिंदेनी म्हटलंय. ‘काही लोक जे काही राजकारण करतायत त्यांनी राजकारण थांबवावं. भैय्याजी जोशी यांनी देखील त्यांच्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे की, महाराष्ट्राची आणि मुंबईची मराठी भाषाच महत्त्वाची आहे. प्रथम भाषा मराठी भाषा आहे. त्यांनी असंही म्हटलं की इतर सगळ्या समाजाची लोकं एकत्र राहतात. परंतु याचा अर्थ मराठी भाषेचा त्यांनी कुठे अपमान केलेला नाही किंबहुना मराठी भाषेला त्यांनी दुय्यम समजलेले नाही’, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली.

Published on: Mar 06, 2025 06:07 PM