Jay Pawar Engagement : अजितदादांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा विशेष आमंत्रितांमध्ये कोण-कोण?

Jay Pawar Engagement : अजितदादांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा विशेष आमंत्रितांमध्ये कोण-कोण?

| Updated on: Apr 10, 2025 | 6:22 PM

दरम्यान, अनेक घरगुती कार्यक्रमांमध्ये अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे एकत्र येताना दिसले पाहायला मिळाले. मात्र जय पवार यांच्या साखरपुड्याला शरद पवार हे हजेरी लावणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम पुण्याजवळच्या गोठावडे गावामध्ये पार पडतोय. अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर हा साखरपुडा समारंभ पार पडत आहे. जय पवार यांचं लग्न सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत पार पडणार आहे. दरम्यान, शरद पवार समारंभासाठी उपस्थित राहणार का? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, व्हीआयपींच्या यादीमध्ये सुप्रिया सुळे, सदानंद सुळे यांचे नाव आहे. मात्र शरद पवार या कार्यक्रमासाठी सुद्धा कुटुंब उपस्थित राहणार का? या आधीच्या कार्यक्रमांमध्ये सुप्रिया सुळे या सहभागी झाल्या होत्या. शरद पवार, प्रतीभा पवार हे देखील आधी झालेल्या पवार कुटुंबीयांच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होते. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमांमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येणार आहे का? याकडे देखील लक्ष असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर घरगुती कार्यक्रम आणि वैयक्तिक संबंध हे वेगळे आणि राजकारण वेगळे असं शरद पवार आणि अजित पवार यांनी स्वतः स्पष्ट केलं होतं. त्यामुळे जय पवार यांच्या साखरपुडा सोहळ्याला हजेरी लावून शरद पवार त्यांना आशीर्वाद देणार का? हे पाहणं औत्सुकत्याचं असणार आहे.

Published on: Apr 10, 2025 06:22 PM