एका गरीब व्यक्तीला मरेपर्यंत मारलं, त्यानंतर त्या मोठ्या मंत्र्याचा बंगला पाडण्याचे आदेश : दीपक केसरकर

| Updated on: Aug 29, 2021 | 11:42 AM

एका गरीब व्यक्तीला एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मरेपर्यंत मारलं. तो व्यक्ती पेटून उठला आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. त्यानंतर या मोठ्या मंत्र्याचा बंगला पाडण्याचे आदेश निघाले, असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय.

Follow us on

शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टोलेबाजी केलीय. एका मोठ्या मंत्र्याचा बंगला पाडल्याचे आदेश दिल्याचं काही लोक म्हणतात. मात्र, एका गरीब व्यक्तीला एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मरेपर्यंत मारलं. तो व्यक्ती पेटून उठला आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. त्यानंतर या मोठ्या मंत्र्याचा बंगला पाडण्याचे आदेश निघाले, असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलंय. | Deepak Kesarkar criticize Narayan Rane indirectly over his bungalow demolition