Delhi Rain Updates : मुसळधार पाऊस! दिल्ली विमानतळाचं छत कोसळलं
Delhi Airport roof collapse : देशभरात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. मुंबईसह दिल्लीत देखील जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
दिल्लीत देखील मान्सूनचं आगमन झालेलं असून मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळावरचं एक छत कोसळलं आहे. दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 2 वर काल रात्री ही घटना घडली आहे.
राज्यासह देशात विविध भागांना मान्सूनच्या पावसाने झोडपून काढलेलं आहे. यामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झालेली आहे. तर काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने गावांमध्ये पाणी शिरलं आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. अशातच दिल्लीत देखील कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी दिल्ली विमानतळावर असलेलं टर्मिनल 2 वरील एक छत कोसळलं आहे. या छतावर पाणी साचुन दबाव वाढल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, या दुर्घटनेवर टीका करत कॉंग्रेसने कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Published on: May 26, 2025 03:02 PM
