Delhi Red Fort Blast Update :  ‘व्हाईट कॉलर’ मॉड्यूलचा अल-फलाह युनिव्हर्सिटीचा संबंध काय? आतापर्यंत कुठे छापे अन् किती अटकेत?

Delhi Red Fort Blast Update : ‘व्हाईट कॉलर’ मॉड्यूलचा अल-फलाह युनिव्हर्सिटीचा संबंध काय? आतापर्यंत कुठे छापे अन् किती अटकेत?

| Updated on: Nov 11, 2025 | 9:02 PM

दिल्लीतील कार स्फोटाच्या तपासात वेगाने प्रगती होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठावर छापे टाकून अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी संशयाच्या घेऱ्यात आले आहेत. डॉ. मुझम्मिल, डॉ. शाहीन यांच्यासह अनेक जणांना अटक करण्यात आली आहे, तर स्फोटात वापरलेल्या i20 कारच्या तपासातून अनेक धागेदोरे उलगडत आहेत.

दिल्लीत झालेल्या कार स्फोटाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही आणि त्यांना कडक शिक्षा दिली जाईल, असे शहांनी स्पष्ट केले आहे. या स्फोटाच्या तपासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून फरिदाबादमधील अल-फलाह विद्यापीठावर हरियाना आणि दिल्ली पोलिसांनी संयुक्त छापा टाकला आहे. या विद्यापीठाशी संबंधित अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी सध्या संशयाच्या रडारवर आहेत. या प्रकरणी, डॉक्टर शाहीन आणि डॉक्टर मुझम्मिल शकील यांच्यासह अनेक जणांना विविध ठिकाणांहून अटक करण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीर, गुजरात आणि फरिदाबाद येथून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. स्फोटात वापरलेली i20 कार सुनहरी मशिदीजवळ तीन तास थांबली होती आणि पार्किंगमधून बाहेर पडल्यानंतर अवघ्या चार मिनिटांत तिचा स्फोट झाला. या कारचा संबंध फरिदाबादमधील दहशतवादी मॉड्युलशी असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे, ज्यानुसार पुढील तपास सुरू आहे.

Published on: Nov 11, 2025 09:02 PM