Bomb Scare Grips Delhi: दिल्लीतील 4 जिल्हा न्यायालयांना अन् CRPF शाळांना बॉम्बच्या धमक्या, ‘त्या’ मेलनं खळबळ

Bomb Scare Grips Delhi: दिल्लीतील 4 जिल्हा न्यायालयांना अन् CRPF शाळांना बॉम्बच्या धमक्या, ‘त्या’ मेलनं खळबळ

| Updated on: Nov 18, 2025 | 6:10 PM

दिल्लीतील द्वारका, पटियाला हाऊस, रोहिणी, साकेत या चार जिल्हा न्यायालयांना आणि द्वारका व प्रशांत विहार येथील दोन सीआरपीएफ शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली आहे. सकाळी ९ वाजता धमकीचा मेल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. बॉम्ब शोधक पथकाने तपास सुरू केला असून, न्यायालये तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. सीआरपीएफ शाळांमधील धमकी खोटी असल्याचे आढळले.

दिल्लीतील चार जिल्हा न्यायालयांना मंगळवारी सकाळी ईमेलद्वारे बॉम्ब असल्याची धमकी मिळाली, ज्यामुळे शहरात खळबळ उडाली. द्वारका, पटियाला हाऊस, रोहिणी आणि साकेत येथील न्यायालयांना ही धमकी मिळाली आहे. याव्यतिरिक्त, द्वारका आणि प्रशांत विहार येथील दोन सीआरपीएफ शाळांनाही बॉम्बच्या धमक्या आल्या होत्या, ज्या नंतर खोट्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सकाळी ९ वाजता धमकीचा मेल आल्यानंतर दिल्ली पोलीस, रॅपिड ॲक्शन फोर्स आणि बॉम्ब शोधक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने पुढील दोन तासांसाठी सर्व न्यायालयांचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. बॉम्ब शोधक पथकाकडून न्यायालयांच्या परिसराची कसून तपासणी सुरू आहे. सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून तपास सुरू केला आहे. धमकीच्या मेलमध्ये अल्लाहच्या लढाईत न्यायालये उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती आणि हा मेल जैश कडून आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Published on: Nov 18, 2025 06:10 PM