Delhi Red Fort Blast : आधी रेकी अन् 26 जानेवारीला लाल किल्ला टार्गेट करण्याचा ‘त्या’ दोघांचा कट पण…तपासातून धक्कादायक माहिती उघड
दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुझम्मिल आणि उमरने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लाल किल्ल्याची रेकी केली होती, अशी माहिती तपास यंत्रणांच्या तपासातून मिळाली आहे. त्यांच्या नियोजनानुसार, 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा कट होता. स्फोटानंतर लाजपत राय मार्केट तिसऱ्या दिवसापासून बंद आहे.
दिल्लीतील लाल किल्ला स्फोटासंदर्भात तपास यंत्रणांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. मुझम्मिल आणि उमर या दोन संशयितांनी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाल किल्ल्याची रेकी केली होती, अशी माहिती समोर आली आहे. मुझम्मिलच्या फोनच्या डंप डेटामधून ही माहिती उघड झाली आहे. त्यांच्या नियोजनाचा एक भाग म्हणून 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते. या स्फोटाप्रकरणी आणखी एक खुलासा झाला आहे.
उमरची i20 कार गेल्या दहा दिवसांपासून अल फलाह विद्यापीठ कॅम्पसमध्ये पार्क केलेली होती. ही कार मुझम्मिलच्या कारशेजारीच उभी होती आणि ती डॉक्टर शाहीन यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. 29 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान ही कार याच ठिकाणी पार्क होती, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरातील स्फोटानंतर जवळचे लाजपत राय मार्केट तिसऱ्या दिवसापासून बंद आहे.
