Delhi Blast Update : ‘हा’ एकच शब्द रिपीट, दहशतवादी उमर अन् मुझ्झमिलची डायरी जप्त; स्फोटाचा छडा लागणार
लाल किल्ला स्फोट प्रकरणात तपास यंत्रणांना काही माहिती हाती लागली आहे. यादरम्यान उमरे जेथे फिरला तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज आणि डायरीतील माहिती दिल्ली स्फोटाच्या तपासात निर्णायक ठरू शकते.
दिल्लीतील लाल किल्ला स्फोट प्रकरणाच्या तपासात महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांनी संशयित दहशतवादी डॉ. उमर आणि मुझम्मील यांच्या खोलीतून डायरी जप्त केली असून, त्यात ऑपरेशनसारखे सांकेतिक शब्द अनेकदा वापरले आहेत. या डायरीतून स्फोटाबाबत अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.
यासह हा संशयित दहशतवादी डॉ. उमर स्फोट घडवण्यापूर्वी दिल्लीतील एका मशिदीत गेला होता आणि तिथून तो लाल किल्ल्याकडे रवाना झाला होता. त्याच्या फरिदाबाद ते दिल्ली प्रवासातील 50 ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज आता पोलिसांच्या ताब्यात आहे. यामध्ये उमर अशोक विहार येथे जेवणासाठी थांबल्याचे, जुन्या मशिदीला भेट दिल्याचे आणि दुपारी 3:19 वाजता लाल किल्ल्याजवळ कार पार्क केल्याचे दिसते.
Published on: Nov 13, 2025 12:58 PM
