Ajit Pawar on vari | अजिबात कारणं नको, आळंदीला रोज पाण द्या, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना बजावलं

| Updated on: Jun 06, 2022 | 2:31 AM

यशदामध्ये 25 हजारांचा कर्मचारी स्टाफ पंढरपूरच्या मानाच्या पालख्यांमध्ये नेमलाय. 10 हजार पोलिसांची संख्या आहे. एसटी आणि चालकांची संख्या आहे. अधिकच्या बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीची माहिती दिली. अष्टविनायक विकास आराखडा तयार केला आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

Follow us on

YouTube video player

पुणे : वारीच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत पवारांनी मीडियाशी संवाद साधत वारीच्या नियोजनाची माहिती दिली. देहू आणि आळंदीच्या प्रस्थानाचं नियोजन केलंय. तयारी पण व्यवस्थित झाली आहे. तिनही पालकमंत्री यांनी बैठक घेतली. वारीचं महत्त्व असं आहे की दोन वर्ष वारीमुळे बंधन आणावी लागली. 15 लाख भाविक पंढरपूरला जमतील. अशा पद्धतीने विचार करून विसाव्याच्या ठिकाणची व्यवस्था करण्यात येणार आहे. 9 ते 10 मानाच्या पालख्यांचा आढाला घेतला. 12 तारखेला पाहणी करतील. सौरभ राव विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी हे पाहणी करतील. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पालखी निघत असताना वारी निघत असताना अँम्बुलन्स, फिरते शौचालय यांची मागणी आली आहे. यशदामध्ये 25 हजारांचा कर्मचारी स्टाफ पंढरपूरच्या मानाच्या पालख्यांमध्ये नेमलाय. 10 हजार पोलिसांची संख्या आहे. एसटी आणि चालकांची संख्या आहे. अधिकच्या बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा वार्षिक नियोजनाच्या निधीची माहिती दिली. अष्टविनायक विकास आराखडा तयार केला आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली.