Ajit Pawar | कोरोनाची परिस्थिती बिकट होत आहे, लोकांना विनंती आहे कठोर निर्णय घ्यायला लावू नका – पवार

| Updated on: Jan 04, 2022 | 8:55 PM

वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी किंवा 2 प्लायचे सर्जिकल मास्क वापरू नका. N95 किंवा 3 प्लाय असलेल्या मास्कचाच वापर करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. त्याचबरोबर उद्यापासून पुणे जिल्ह्यात सर्वत्र मॉल, खासगी तसंच सरकारी कार्यालयात कोरोना लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर प्रवेश मिळणार नाही.

Follow us on

YouTube video player

पुणे : पुण्यात उद्यापासून मास्क नसेल तर 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. तर रस्त्यावर थुंकल्यावर 1 हजार रुपये दंड आकारला जाईल. वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी किंवा 2 प्लायचे सर्जिकल मास्क वापरू नका. N95 किंवा 3 प्लाय असलेल्या मास्कचाच वापर करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. त्याचबरोबर उद्यापासून पुणे जिल्ह्यात सर्वत्र मॉल, खासगी तसंच सरकारी कार्यालयात कोरोना लसीचे दोन्ही डोस झाले नसतील तर प्रवेश मिळणार नाही. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस खात्याला सक्त सूचना दिल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.