Ajit Pawar | ‘कोंबड्याला मांजर करुन कोकणाचा विकास होत नाही – अजित पवार
अजित पवार आज रत्नागिरीत आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना राणे-मलिक वादावरही छेडण्यात आलं असता अजित पवार यांनी आपल्या स्टाईलने नितेश राणेंना फटकार लगावली.
रत्नागिरी: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि भाजप नेते नितेश राणे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून ट्विटर वॉर सुरू आहे. प्राण्याची चित्रं ट्विटरवर पोस्ट करून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला आहे. या वादात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेतली आहे. कोंबड्यांना मांजर करून कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का?, असा सवाल करत अजित पवार यांनी नितेश राणे यांना फटकारले आहे. अजित पवार आज रत्नागिरीत आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना राणे-मलिक वादावरही छेडण्यात आलं असता अजित पवार यांनी आपल्या स्टाईलने नितेश राणेंना फटकार लगावली. कोंबड्यांना मांजर केलं जात असल्याचं मी टीव्हीवर पाहत आहे. अशाने कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का? कोकणाचा विकास होणार आहे का? असा सवाल पवार यांनी केला.
