Shinde Meeting : हिंदी सक्तीचा निर्णय ठाकरेंनी घेतला हे सर्वांना सांगा; शिंदेंचे नेत्यांना आदेश
Maharashtra Politics : कार्यकारणी बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत बैठक झाली.
कार्यकारणी बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत बैठक झाली. अधिवेशनात विरोधी पक्षाला कोंडीत पकडण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे. हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना घेतला, हे सर्वांपर्यंत पोहोचवा असे आदेश शिंदेंनी दिले आहेत.
कार्यकारणीनंतर झालेल्या या बैठकीत एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना महत्वाचे आदेश दिले आहेत. आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधीपक्षाला कोंडीत पकडण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे. महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेत वक्तव्य करण्याच्या सूचना देखील शिंदेंनी दिल्या आहेत. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या सेनेला चोख प्रत्युत्तर देण्याच्याही सूचना दिल्या गेल्या आहेत. तसंच राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना घेतला होता हे सर्वांपर्यंत पोहोचवा असेही आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
