इथं कबुतरखान्यात धान्य टाकायला बॅन, यानं तर चौपाटीवरच ओतल्या एक-दोन नाही तर 10 गोण्या अन्….

इथं कबुतरखान्यात धान्य टाकायला बॅन, यानं तर चौपाटीवरच ओतल्या एक-दोन नाही तर 10 गोण्या अन्….

| Updated on: Aug 09, 2025 | 3:59 PM

गिरगाव चौपाटीवर कबुतरांसाठी दहा गोण्या धान्य टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे दिसत आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेकडून अनेक ठिकाणी कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पाहायला मिळतंय. तर मनाई असतानाही कबुतरखान्यात दाणे-धान्य घालणाऱ्या व्यक्तीवर पालिकेकडून कारवाई केली जाताना दिसतेय. असे असताना काही नागरिकांकडून हा नियम मोडण्यात येतोय. अशातच मुंबईतील गिरगाव चौपाटीवर कबुतरांसाठी एक नाही दोन नाही तब्बल दहा गोण्या धान्य ओतल्याचे समोर आले आहे. इतकंच नाहीतर या व्यक्तीने कबुतरांना धान्य घालतानाचा व्हिडीओ देखील काढल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, कबुतरांना धान्य घालतानाचा व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीचा मुंबई महापालिकेकडून कसून शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना दाणापाणी देण्यास मनाई केली आहे. असे असूनही गिरगाव चौपाटीवर दहा गोण्या धान्य टाकून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले आहे. कबुतरांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे कारण देत उच्च न्यायालयाने यावर बंदी आणली होती.

Published on: Aug 09, 2025 03:41 PM