Devendra Fadnavis | मुख्यमंत्री सोडाच, पालमंत्र्यांकडूनही नुकसानीची पाहणी नाही : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Oct 04, 2021 | 10:46 AM

राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतरही एकाही मंत्र्यांनी शेताच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली नाही. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सीएम सोडाच पालकमंत्र्यांनीही पाहणी दौरा केला नाही. सीएम यांनी तात्काळ दौरा केला पाहिजे. हे सरकार विदर्भ, मराठवाडा विरोधी सरकार आहे, असा आरोप करतानाच पीकविमा सरकारची जबाबदारी आहे. कंपनीवर दबाव वाढवत शेतकऱ्यांना सरकारनेच दिलासा दिला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

Follow us on

अतिवृष्टीच्या पाहणी दौऱ्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हे कागदावरचे नेते आहेत. ऑफिसच्या एसीत बसून मोठे झालेले हे लीडर आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू काय समजणार?, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना डिवचले आहे.

देवेंद्र फडणवीस आज लातूरमध्ये आहेत. लातूरमधील पूरपरिस्थितीची ते पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. जे लोक ऑफिसमध्ये बसून टीका करतात. अग्रलेख लिहून नेते होतात. त्यांना शेतकऱ्यांचा दुःख काय माहीत? हे ऑफिसमधले लीडर आहेत. हे कागदावरचे लीडर आहेत. त्यांना काय उत्तर द्यायचं, असं फडणवीस म्हणाले.