Devendra Fadnavis Exclusive : गोवा ते चिपी, संजय राऊत ते रामदास तडस, देवेंद्र फडणवीस रोखठोक

| Updated on: Sep 08, 2021 | 4:57 PM

चिपी विमानतळ उद्घाटनासह अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोंडीवर विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी भाष्य करत आपलं मत व्यक्त केलं आहे. ते नागपूरात बोलत होते.

Follow us on

चिपी विमानतळ उद्घाटनाच्या मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेकडून चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर करण्यात आलीय. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत 9 ऑक्टोबरला नारी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत विमानतळ उद्घाटन होईल, असं जाहीर केलंय. महत्वाची बाब म्हणजे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गरज नसल्याचं राणे म्हणालेत. याबाबत विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.

‘चिपी विमानतळ तयार करण्यामध्ये राणे यांचा सहभाग कुणीच नाकारु शकत नाही. राणे यांच्या काळात विमानतळाच्या कामाची सुरुवात झाली. मी मुख्यमंत्री असताना ते काम पूर्ण झालं. त्याचं एक उद्घाटन आम्ही केलं आहे. आता तिथून विमान उडणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या परिस्थितीत हा वाद न करता, कोकणाच्या विकासासाठी आणि कोकणाच्या पर्यटनाला खऱ्या अर्थानं चालना देणारं अशाप्रकारचं हे विमानतळ, याच्यावर फ्लाईट सुरु होणं हे कोकणासाठी अत्यंत महत्वाचं आहे. मी राणे साहेब आणि आमचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो. शेवटी राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं समन्वयानंच काम करायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की श्रेयवादाची काही लढाई नाही. राणेंचं जे काही योगदान आहे ते कुणीही नाकारु शकत नाही’, असं फडणवीस यांनी म्हटलंय.