4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 PM | 16 November 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 PM | 16 November 2021

| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 8:03 PM

आता महाविकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारावाच लागेल, असा इशाराही फडणवीसांनी दिलाय. मुंबईत आज भाजपच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी फडणवीस यांच्यासह सर्वच भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

‘महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्या प्रकारचा अनाचार, दुराचार आणि भ्रष्टाचार पाहायला मिळतोय. त्यावरुन महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारचं नाव नोंद होईल’, असा घणाघात माजी मुख्यमंत्री आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. इतकंच नाही तर आता महाविकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारावाच लागेल, असा इशाराही फडणवीसांनी दिलाय. मुंबईत आज भाजपच्या कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. त्यावेळी फडणवीस यांच्यासह सर्वच भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.