Devendra Fadnavis : चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्रालयातून निधी घेण्यात अग्रेसर, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं

| Updated on: Aug 13, 2022 | 5:46 PM

चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्रालयातून निधी घेण्यात अग्रेसर आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, भाजपच्या वरिष्ठांनी महाराष्ट्राची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपविली आहे.

Follow us on

नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे हे मंत्रालयातून निधी घेण्यात अग्रेसर आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, भाजपच्या वरिष्ठांनी महाराष्ट्राची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सोपविली आहे. राज्यातील भाजपचं अध्यक्षपद मिळणं ही फार मोठी जबाबदारी आहे. सत्ताधारी आणि सर्वात मोठा पक्ष आहे. अध्यक्षपद हे जबाबदारीचं आहे. हा मोठा सन्मान आहे. बावनकुळे सकाळी निघाले की, कामं पूर्ण केल्याशिवाय जात नाही. एखादं काम हाती घेतलं की, त्याचा पाठपुरावाही ते करतात. त्यामुळं महामंत्री म्हणून चांगल्या प्रकारे काम केलं. गावोगावी फिरले. विधानसभेची तिकीट पक्षानं नाकारल्यावर त्यांचं राजकारण संपलं, अशी टीका होत होती. परंतु, त्याही परिस्थितीत त्यांनी पक्षाचं काम केलं. त्यानंतर विधानपरिषदेवर ते निवडून आले. आता पक्षानं त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे.