अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला उशीर केला, देवेंद्र फडणवीसांची टीका
अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यायला उशीर केला, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. Anil Deshmukh Devendra Fadnavdis
मुंबई: अनिल देशमुखांचा राजीनामा देण्याकरिता उशीर झाला. आमची अपेक्षा अशी होती की, इतके गंभीर आरोप लागल्यानंतर आणि रश्मी शुक्लांचा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर तात्काळ अनिल देशमुख यांचा राजीनामा राष्ट्रवादी पक्षाने आणि पवार साहेबांनी घ्यायला हवा होता. परंतु त्याकरिता उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागली. अशा गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून समोर यायला पाहिजेत, पण तशा पद्धतीने आलेल्या नाहीत, असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय
