Devendra Fadnavis | OBC इम्पेरिकल डेटाचा ठराव हा वेळकाढूपणा, देवेंद्र फडणवीस LIVE
राज्य सरकार या अधिवेशनात इम्पिरिकल डेटाचा ठराव मांडणार आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. इम्पिरीकल डेटाचा ठराव हा निव्वळ वेळकाढूपणा आहे
राज्य सरकार या अधिवेशनात ओबीसींच्या इम्पिरिकल डेटाचा ठराव मांडणार आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. इम्पिरीकल डेटाचा ठराव हा निव्वळ वेळकाढूपणा आहे. त्यातून काहीही साध्य होणार नाही. परंतु, तरीही ओबीसींसाठी आम्ही या ठरावाला पाठिंबा देणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इम्पिरीकल डेटावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. विधीमंडळातील ओबीसींच्या इम्पिरीकल डेटाचा ठराव म्हणजे वेळकाढूपणाचं धोरण आहे. सर्वोच्च न्यायालयाने इम्पिरीकल इन्क्वायरी करायला सांगितली आहे. सेन्सस नाही. कृष्णमूर्ती खटल्यातही तेच म्हटलं आहे. पण हे सरकार वेळकाढूपणा करून दिशाभूल करत आहे. त्यासाठीच हा ठराव आणला आहे. तरीही आम्ही या ठरावाला समर्थन देऊ. ओबीसी, मराठ्यांसाठी जे काही चांगलं होत असेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ, असं फडणवीस म्हणाले.
