First Ministry Expansion : ‘या’ दिवशी इतर मंत्र्याचा शपथविधी, कुणाला किती मंत्रिपदं? शिवसेनेच्या नेत्याची मोठी माहिती
येत्या ११ डिसेंबर रोजी इतर मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता असल्याची मोठी माहिती शिवसेनेचे नेते आणि आमदार भरत गोगावले यांनी दिली. भरत गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करताना असे म्हटले की...
येत्या ११ डिसेंबर रोजी फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी ३३ जणांचा शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अशातच येत्या ११ डिसेंबर रोजी इतर मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता असल्याची मोठी माहिती शिवसेनेचे नेते आणि आमदार भरत गोगावले यांनी दिली. भरत गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करताना असे म्हटले की, आज एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. पंतप्रधानांचा वेळ कमी मिळाल्याने तिघांचा शपथविधी होईल. कोणाला किती खाती मिळतील चर्चेअंती तिढा सुटेल, असं त्यांनी म्हटलं. तर एकनाथ शिंदेंनी जे मागितलंय त्यावर दुपारपर्यंत निर्णय होईल. भविष्यात काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी काही निर्णय सावकाश घेतले जातील. यावेळी आम्हाला संधी मिळेल. आपले सवंगडी सत्तेत आले तर पक्षाचा फायदा नक्की होईल. नाराजी संपली म्हणूनच राज्यपालांना स्वत: जाऊन पाठिंबा दर्शवला आहे, असे म्हणत असताना संजय राऊत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधलाय. संजय राऊतने बोलतच राहावं. ते जेवढे बोलतात तेवढा आमचा फायदा झाला. विरोधकांना निमंत्रण दिल आहे. यायचं की नाही ते त्यांनी ठरवावं.
