Dhananjay Munde Video : ‘संतोष देशमुखांच्या आरोपींना फासावर चढवा अन्…’, धनंजय मुंडेंची मोठी मागणी काय?

Dhananjay Munde Video : ‘संतोष देशमुखांच्या आरोपींना फासावर चढवा अन्…’, धनंजय मुंडेंची मोठी मागणी काय?

| Updated on: Jan 29, 2025 | 3:52 PM

'५१ दिवसात मी एकच गोष्ट बोललोय की जे सरपंच देशमुख यांची हत्या झाली. त्या सर्व, जे दोषी असतील, त्यांना फाशी झाली पाहिजे', असं म्हणत धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केले आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह महायुती सरकारवर त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावर बोलताना म्हणाले, ‘५१ दिवसात मी एकच गोष्ट बोललोय की जे सरपंच देशमुख यांची हत्या झाली. त्या सर्व, जे दोषी असतील, त्यांना फाशी झाली पाहिजे’, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केले आहे. पुढे ते असेही म्हणाले, आरोपींना मोठ्यातील मोठी शिक्षा द्या ही मागणी आहे. कोण किती दिवस फरार आहे, तुम्ही माझ्यावर ट्रायल करत असाल तर मी त्या गोष्टीवर बोलू नये, असंही धनंजय मुंडे म्हणाले. तर ५१ दिवस ज्या पद्धतीने ट्रायल सुरू आहे. टार्गेट मी आहे. मी निष्ठावंत आहे. निवडणुकीत जिथे जाईल तिथे माझ्या पक्षाचा प्रचार करेल. आपण निवडणुकीत टीका करतो आणि टीका सहनही करतो. पुन्हा राग नसतो. माझ्या विरोधात प्रचाराला होते म्हणून आपण असं करावं हे योग्य नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले. यानंतर याप्रकरणात धनंजय मुंडेंवर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. यासंदर्भात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘माझी नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे. जी गोष्ट घडलीय. त्याबाबत मी जे बोललो ते प्रामाणिक बोललो. मी नैतिकतेत दोषी आहे असं मला वाटत नाही. माझा दोष माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल’

Published on: Jan 29, 2025 03:52 PM