ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतीगृह उभारण्यास मंजुरी, एक स्वप्न पूर्ण झालं : धनंजय मुंडे

| Updated on: Jun 02, 2021 | 8:10 PM

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतीगृह उभारण्यास मंजुरी, एक स्वप्न पूर्ण झालं : धनंजय मुंडे

Follow us on

मुंबई : स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पहिल्या टप्प्यात मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र प्रत्येकी 10 वसतिगृह सुरू करण्यात येतील. नवीन वसतिगृहे बांधण्यास कालावधी लागणार असल्याने सुरुवातीला ही वसतीगृहे भाड्याच्या इमारतीत सुरू करण्यात येतील. याच निर्णयानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी खालील प्रतिक्रिया दिली आहे.