Dhananjay Munde : 200 दिवस न बोलता काढले पण वैर माझ्याशी होतं तर… मुंडेंनी विरोधकांना चांगलंच फटकारलं
"तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता, जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता, अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारे लोह से ये लोहा पिघल नहीं सकता," अशी शेरोशायरी करत धनंजय मुंडेंनी विरोधकांना फटकारलंय.
वैर माझ्याशी होतं तर बदनामी बीड जिल्ह्याची का केली? असा सवाल धनंजय मुंडे यांनी यावेळी उपस्थित केलाय तर बऱ्याच दिवसांनी मी बोलतोय. न बोलण्याची डबल सेच्युरी झाली, २०० दिवस न बोलता काढले असेही धनंजय मुंडे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये नुकतेच निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या माध्यमातून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर जोरदार घणाघात केला. निर्धार मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, मी २०० दिवस न बोलता काढले आहेत. या दोनशे दिवसांमध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या, त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिव्हारी लागली. ती म्हणजे आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी. ज्यांनी कोणी केली, भलेही तो बीडच्या मातीतला असेल, बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल, त्यांना एवढंच सांगायचं वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? असा सवाल त्यांनी विरोधकांना करत त्यांच्यावर निशाणा साधलाय.
