Dhananjay Munde Video: सरपंच हत्येतील आरोपींबद्दल धनंजय मुंडे स्पष्टच बोलले, ‘जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ…’

Dhananjay Munde Video: सरपंच हत्येतील आरोपींबद्दल धनंजय मुंडे स्पष्टच बोलले, ‘जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ…’

| Updated on: Jan 22, 2025 | 12:44 PM

मंत्री धनंजय मुंडे यांनी संत वामनभाऊ यांच्या समाधीच दर्शन घेतलं. ते 49 व्या पुण्यतिथी सोहळ्यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी मीडियाशी संवाद साधला. बघा काय म्हणाले धनंजय मुंडे?

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तुरुंगात वेगळी ट्रीटमेंट मिळतेय असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. या आरोपाबद्दल धनंजय मुंडे यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले, “या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही. मला प्रश्न विचारु नका. मी स्पष्टपणे सांगितलय, जे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे हत्यारे आहेत, त्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा. त्यांना तात्काळ फाशी द्या. कोणी काय म्हणावं हा विषय वेगळा. तुम्हाला बातमी, टीआरपी पाहिजे. त्याशिवाय जाहीराती मिळत नाहीत, जाहीरातीला रेट मिळत नाही. पोलिसांकडून योग्य तपास सुरु आहे.” , असं स्पष्ट म्हणत धनंजय मुंडे यांनी सविस्तर बोलणं टाळलंय. तर मंत्री धनंजय मुंडे यांनी संत वामनभाऊ यांच्या समाधीच दर्शन घेतलं. 49 व्या पुण्यतिथी सोहळ्यात ते सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले, “मी 25 वर्ष इथे नियमित येतोय. हे माझं 25 वं वर्ष आहे. आदरणीय विठ्ठलबाबांनी मला आदेश दिला. पुण्यतिथीची महत्त्वाची मानाची पूजा आहे. माझ्या हस्ते ही पूजा होतेय. पुण्यातिथीच्या आदल्यादिवशी मी या गडावर मुक्कामी असतो. आज व्यवस्थित, चांगली पुण्यतिथीची पूजा झाली. ही पूजा करुन खरी ऊर्जा, प्रेरणा मिळते. समाजकारण, राजकारण लोकांची सेवा करायची ताकद घेऊन पुढे निघालो आहे.”

Published on: Jan 22, 2025 12:44 PM