Dhananjay Munde : वंजाऱ्यांचं 2 टक्के काढा म्हणणाऱ्यांचा टक्का पण ठेवणार नाही, मुंडेंचा जरांगेंना थेट इशारा

Dhananjay Munde : वंजाऱ्यांचं 2 टक्के काढा म्हणणाऱ्यांचा टक्का पण ठेवणार नाही, मुंडेंचा जरांगेंना थेट इशारा

| Updated on: Oct 13, 2025 | 8:23 PM

माजी मंत्री धनंजय मुंडेंनी मनोज जरांगेंना वंजारी आरक्षणावरून इशारा दिला आहे. वंजारी समाजाचे दोन टक्के आरक्षण रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांना सोडणार नाही, असे मुंडे म्हणाले. हैदराबाद गॅझेटनुसार इतरांना आरक्षणाचा फायदा मिळत असल्यास वंजारी समाजालाही एसटीचा लाभ मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना वंजारी समाजाच्या आरक्षणावरून थेट इशारा दिला आहे. वंजारी समाजाचे दोन टक्के आरक्षण काढण्याची मागणी करणाऱ्यांना “टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही” अशी आक्रमक भूमिका मुंडे यांनी घेतली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील वाडगाव थाटे येथे वंजारी समाज बांधवांचे उपोषण सुरू होते. या उपोषणकर्त्यांशी फोनवरून संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी जरांगेवर निशाणा साधला.

मुंडे यांनी स्पष्ट केले की, जर हैदराबाद गॅझेटनुसार इतरांना आरक्षणाचा, विशेषतः एसटीचा, फायदा मिळत असेल, तर वंजारी समाजालाही त्या गॅझेटप्रमाणे एसटीचा लाभ मिळाला पाहिजे. हैदराबाद गॅझेटमधील प्रत्येक शब्दाचा फायदा आरक्षणासाठी इतरांना होत असेल, तर तो वंजारी समाजालाही मिळायला हवा, असे ते म्हणाले. वंजारी समाजाचे आरक्षण काढण्याची मागणी काहीजण करत असल्याचे ते म्हणाले. या आंदोलकांना उपोषण सोडण्याचे आवाहनही धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.

Published on: Oct 13, 2025 08:23 PM