“मोदी है तो मुमकीन है”, घोषणेची धनंजय मुंडे यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, या फंद्यात पडू नका…

| Updated on: May 28, 2023 | 2:05 PM

पुण्याच्या कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा लोणारी समाजाच्या मेळाव्यात परळी येथे सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला माजी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.

Follow us on

बीड: पुण्याच्या कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा लोणारी समाजाच्या मेळाव्यात परळी येथे सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला माजी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी चौफेर फटकेबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शाह आणि भाजपवर निशाणा साधला आहे. तसेत भाजप समर्थकांच्या ‘मोदी है तो मुमकिन है’ या घोषणेची चांगलीच खिल्ली उडवली. “मोदी है तो मुमकिन है’ च्या फंद्यामध्ये अडकून राहू नका. भाजपचे राजकारण याच पद्धतीचे आहे. आपण अनेक वेळा रोष व्यक्त करतो, परंतु मध्येच कुठलातरी भावनिक, देश प्रेमाचा, धर्माचा मुद्दा पुढे आणला जातो आणि मग आपण त्यालाच बळी पडून सरकारवरचा राग विसरून त्यांनाच मतदान करतो, हा एक फंदा असून या ‘मोदी है तो मुमकीन है’च्या फंद्यात अडकू नका”, असं धनंजय मुंडे म्हणाले.