Dhananjay Munde BIG News : अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा, ‘सागर’वर मुख्यमंत्र्यांकडे प्रत सुपूर्द

Dhananjay Munde BIG News : अखेर धनंजय मुंडे यांचा राजीनामा, ‘सागर’वर मुख्यमंत्र्यांकडे प्रत सुपूर्द

| Updated on: Mar 04, 2025 | 10:58 AM

मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल निर्देश दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या पीएच्या माध्यमातून सागर बंगल्यावर आपल्या राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली आहे. 

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. धनंजय मुंडे यांचे पीए राजीनाम्याची एक प्रत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय सागर या बंगल्यावर दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. यासंदर्भात काल बैठकांचा सिलसिला देखील पाहायला मिळाला. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अखेर 82 दिवसानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. काल रात्री देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक झाली. यावेळी आधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा झाली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तिथे हजर झाले आणि यावेळीच धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल निर्देश दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या पीएच्या माध्यमातून सागर बंगल्यावर आपल्या राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली आहे.

Published on: Mar 04, 2025 10:44 AM