Dhananjay Munde : आधी ध्यानधारणा अन् विपश्यना, आता धार्मिक विधी; माध्यमांसमोर मुंडेंचं मौनव्रत

Dhananjay Munde : आधी ध्यानधारणा अन् विपश्यना, आता धार्मिक विधी; माध्यमांसमोर मुंडेंचं मौनव्रत

| Updated on: Jun 04, 2025 | 3:20 PM

Dhananjay Munde In Nashik : माजी मंत्री धनंजय मुंडे आज नाशिकच्या रामकुंडावर दिसून आले. एका धार्मिक कार्यक्रमाला ते या ठिकानणी आले होते.

विपश्यना केंद्रात ध्यानसाधना केल्यानंतर आता माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिकच्या रामकुंडावर धार्मिक विधी केला आहे. काही दिवसांपूर्वी मुंडे मन:शांतीच्या शोधात नाशिकच्या इगतपुरी येथील विपश्यना केंद्र गाठलं होतं. तर आज ते पुन्हा एकदा धार्मिक कार्यक्रमासाठी रामकुंडावर आल्याचे दिसले. मात्र यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. काल देखील गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात भगवान गडावर मुंडे यांनी भाषण करण्याचं टाळलं होतं. आज रामकुंडाववरील वस्त्रांतर गृहात धार्मिक विधी पार पडले. या सर्व विधीनंतर मुंडे जेव्हा बाहेर आले तेव्हा माध्यमांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला. हाताने ओठांवर बोट फिरवून मौन असल्याचा सूचक संदेश देखील धनंजय मुंडे यांनी दिला.

Published on: Jun 04, 2025 03:20 PM