MSRTC : एसटी महामंडळाच्या ‘या’ बसमध्ये जागा राखीव असतानाही दिव्यांगांना No Entry… कारण काय?

MSRTC : एसटी महामंडळाच्या ‘या’ बसमध्ये जागा राखीव असतानाही दिव्यांगांना No Entry… कारण काय?

| Updated on: Jun 21, 2025 | 4:44 PM

एस टी महामंडळाच्या शिवाय इलेक्ट्रिक गाडीमध्ये दिव्यांगांना नो एन्ट्री... शिवाई एसटी बसमध्ये दिव्यांगासाठी राखीव सीट आहे. मात्र तिकीट मशीनमध्ये इन्स्टॉलेशन नसल्यामुळे दिव्यांगांना डावलण्यात आले.

एसटी महामंडळाच्या शिवाई या इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांगांना नो एन्ट्री असल्याचे पाहायला मिळत आहे. एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक शिवाई एसटी बसमध्ये दिव्यांगासाठी राखीव सीट आहे. मात्र तरी देखील शिवाई या इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांगांना प्रवेश देण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्याचे कारण म्हणजे एसटी महामंडळाच्या शिवाई या इलेक्ट्रिक बसमध्ये तिकीट मशीनमध्ये इन्स्टॉलेशन नसल्यामुळे दिव्यांगांना डावलण्यात आल्याचा आरोप होतोय. शिवाई या इलेक्ट्रिक बसमध्ये तिकीट मशीनमध्ये इन्स्टॉलेशन दिव्यांगाच्या तिकीटाचं इन्स्टॉलेशन नसल्याने दिव्यांगांना राखीव जागा उपलब्ध होत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये पाच हजार इलेक्ट्रिक गाड्या दाखल होणार आहेत. त्यामध्ये तरी दिव्यांगांना बसण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी दिव्यांग प्रवाशांकडून केली जात आहे.

Published on: Jun 21, 2025 04:44 PM