Dharashiv : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी… आपल्या मुलाच्या लग्नात थेट हेलिकॉप्टरनं मिरवणूक, थाट तर बघा…

Dharashiv : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी… आपल्या मुलाच्या लग्नात थेट हेलिकॉप्टरनं मिरवणूक, थाट तर बघा…

| Updated on: Apr 18, 2025 | 7:40 PM

धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा नादच खुळा.... पाहायला मिळाला. धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची हौस म्हणून त्याने आपल्या मुलाच्या लग्नाची वरात थेट हेलिकॉप्टरमधून काढल्याचे पाहायला मिळाले.

धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा चांगलाच बोलबाला होताना दिसतोय. काबाड कष्ट करणाऱ्या बळीराजाच्या या स्वॅगची चांगलीच चर्चा होत आहे. धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची हौस म्हणून त्याने आपल्या मुलाच्या लग्नाची मिरवणूक थेट हेलिकॉप्टरने काढली आहे. धाराशिवच्या भूम तालुक्यातील अंतरवली गावातील शेतकरी भास्कर शिकेतोड या शेतकऱ्याने आपल्या मुलाच्या लग्नासाठी थेड हेलीकाॅप्टर मागवला आहे. शिकेतोड यांचा मुलगा आकाश आणि अस्मीता या दोघांचा विवाह आज पार पडला. यांच्याच लग्नात नवरदेवाची मिरवणूक थेट हेलीकॉप्टरने काढण्यात आल्याने पंचक्रोशीत या फिल्मी स्टाईल लग्नाची चर्चा होतेय. भास्कर शिकेतोड यांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नात ही हेलीकॉप्टरमधून मिरवणूक काढाली होती, असे त्यांनी स्वतः सांगितले. भास्कर शिकेतोड यांच्या स्वतःच्या लग्नात त्यांची मिरवणूक मोटारसायकलवरुन काढण्यात आली होती. माञ आपली हौस भागवण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांच्या लग्नात हेलीकॉप्टरने मिरवणूक काढायची असं शिकेतोड यांनी ठरवलं होतं, असंही त्यांनी टीव्ही ९ मराठीला संवाद साधताना सांगितलं.

Published on: Apr 18, 2025 07:37 PM