लाडक्या गायीचा सर्पदंशानं मृत्यू, धुळ्यातील शेतकऱ्याची कृतज्ञता, बैलगाडीतून अंत्ययात्रा

| Updated on: Aug 05, 2021 | 6:10 PM

रामदास बाबुराव सूर्यवंशी या शेतकऱ्याची ही गाय होती. तिच्या मृत्यूनंतर या शेतकऱ्याने घरातील सदस्याप्रमाणे या गाईची वाजत गाजत अंत्ययात्रा गावातून काढली.

Follow us on
धुळे तालुक्यातील वाघाडी या गावातील रामदास सूर्यवंशी या  शेतकऱ्याची गाभण गाय सर्पदंशाने मृत्युमुखी पडली. रामदास बाबुराव सूर्यवंशी या शेतकऱ्याची ही गाय होती. तिच्या मृत्यूनंतर या शेतकऱ्याने घरातील सदस्याप्रमाणे या गाईची वाजत गाजत अंत्ययात्रा गावातून काढली. गाईची अंत्ययात्रा बघून गावातील नागरिक देखील भारावून गेले. कित्येक वर्षांपासून ही गाय घरात होती त्या गाईच्या दुधावर संपूर्ण कुटुंबीय अवलंबून होते. घरातील सदस्याचा मृत्यू झाला असावा अशा पद्धतीने सर्व कुटुंबीयांनी डोळ्यातून निघणाऱ्या अश्रूंच्या धारानि या लाडक्या गायीला अखेरचा निरोप दिला आहे. लळा लावला की रानातलं पाखरू देखील मानसाळत तसंच काहीसं या गायीच्या बाबतीत देखील सूर्यवंशी कुटुंबीयांनी लळा लावलेला होता आणि त्यामुळेच सूर्यवंशी कुटुंबीयांनी सर्पदंशाने मृत पावलेल्या आपल्या लाडक्या गायीचा अंत्यविधी घरातील सदस्याप्रमाणे केला आहे.