अजित पवार यांना राखी बांधली का? सुप्रिया सुळे यांनी हे कारण देत सांगितलं…

| Updated on: Sep 07, 2023 | 9:12 PM

राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. फक्त नऊ आमदार आणि दोन खासदार यांनी पक्षविरोधी कारवाई केली आहे. त्यांच्याविरोधात आम्ही न्यायालयात गेलो आहोत.

Follow us on

बीड : 7 सप्टेंबर 2023 | भाजपाने मराठा, धनगर, मुस्लीम आणि लिंगायत समाजाची आरक्षण संदर्भात फसवणूक केली. इतर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. गृहमंत्र्यांना सर्व सुख सुविधा उपभोगता येतात. पण, घडलेल्या परिस्थितीची जबाबदारी घेऊन फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. तसेच, लोकसभेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर निर्णय घ्या, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. शरद पवार साहेबांनी बीड जिल्ह्याला काहीच दिलं नाही असे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. त्यावर बीड जिल्ह्याला काय दिले याचा बायोडाटा माझ्याकडून घ्यावा अशा शब्दात त्यांनी मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठलीच फुट झाली नाही. अजित पवार यांना राखी बांधली का? असा प्रश्न त्यांना केला असता माझा मावस भाऊ आणि श्रीनिवास पाटील यांना मी राखी बांधली पण, दादा त्यादिवशी उपस्थित नव्हता असे त्यांनी सांगितले.