Thane : कुठं सापांचा वावर तर कुठं स्लॅब कोसळला, ठाण्यात न्यायाधीशांची निवासस्थाने धोकादायक; 1969 चं बांधकाम जीर्णावस्थेत
ठाण्यातील जिल्हा न्यायाधीश प्रज्ञा काळे यांच्या निवासस्थानाची अतिशय दुरवस्था झाली आहे. १९६९ मध्ये बांधलेल्या या इमारतीचा छताचा स्लॅब कोसळला आहे. न्यायाधीशांनी पोलिसात तक्रार केली असून, इमारतीची दुरवस्था लक्षात घेता, उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
ठाण्यातील जिल्हा न्यायाधीश प्रज्ञा काळे यांच्या निवासस्थानाची धोकादायक स्थिती समोर आली आहे. १९६९ मध्ये बांधलेली ही तीनमजली इमारत “चैतन्य” अक्षरशः जर्जर अवस्थेत असून पूर्णतः जीर्ण झाल्याचे दिसत आहे. नुकताच न्यायाधीश प्रज्ञा काळे या राहत असलेल्या इमारतीच्या छताचा एक स्लॅब कोसळला. या घटनेनंतर न्यायाधीश प्रज्ञा काळे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बारा बंगला परिसरातील ही इमारत झाडांनी वेढलेली असल्याने सापांचाही मोठ्या प्रमाणात वावर या परिसरात असतो. त्यामुळे लहान मुलांना बाहेर खेळण्यास येणंही धोकादायक ठरत आहे. या इमारतीच्या दुरवस्थेमुळे न्यायाधीशांना आणि इतर रहिवाशांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या इमारतीची दुरुस्ती किंवा पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
Published on: Sep 10, 2025 12:13 PM
