Air India : विमानतळ दिसतंय, तरीही विमानाच्या हवेतच तासभर घिरट्या, कारण ऐकताच तुम्ही माराल डोक्यावर हात

Air India : विमानतळ दिसतंय, तरीही विमानाच्या हवेतच तासभर घिरट्या, कारण ऐकताच तुम्ही माराल डोक्यावर हात

| Updated on: Jun 30, 2025 | 10:55 AM

अहमदाबाद येथील ‘एअर इंडिया’च्या विमान अपघाताची घटना ताजी असतानाच पुणे विमानतळावर एक गंभीर प्रकार पाहायला मिळाला. पुणे विमानतळावर भुवनेश्वर येथून येणारं विमान पुण्यात उतरत असताना कुत्र्याचा अडथळा आल्याने विमानानं हवेतच घिरट्या घातल्या.

पुण्यातून एक बातमी आहे. पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर अचानक कुत्रा आल्याने विमानानं हवेतच बऱ्याच वेळ घिरट्या घातल्याचा प्रकार पाहायला मिळाला. वैमानिकाने सुमारे दीडशे फूट उंचीवर असताना लँडिंग थांबवले. या प्रकारामुळे एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं. आय एक्स 1097 हे एअर इंडियाचं विमान भुवनेश्वरवरून पुण्याला येत होते. हे विमान भुवनेश्वरवरून पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर उतरवण्याच्या प्रक्रियेत होते. मात्र आकाशात विमान सुमारे 100 ते 150 फूट उंचीवर असताना वैमानिकाला धावपट्टीवर कुत्रा आढळून आला.

यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वैमानिकाने लँडिंग न करण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा विमान हवेत झेपावले विमान आणखी काही फूट खाली असते तर वैमानिकाला पुन्हा विमान आकाशात झेपावणे अवघड झाले असते. दरम्यान, पुणे विमानतळावरून कुत्र्याला हुसकावून लावल्यानंतर विमानाचे सुरक्षित लँडिंग झाले. मात्र यामुळे विमानाला सुमारे एक तास उशीर झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती मिळतेय.

Ahmedabad Plane Crash : दुर्घटनेचं कारण आलं समोर, थ्रस्ट प्रॉब्लेम… या एका कारणामुळंच विमान कोसळलं, थ्रस्ट म्हणजे नेमकं काय?

Published on: Jun 30, 2025 10:55 AM