Explainer : डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची धमकी त्यांच्याच अंगलट कशी येणार?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या अमेरिकेतील तांदळाच्या निर्यातीवर कर लादण्याची धमकी दिली. व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत काय म्हणाले ट्रम्प? या व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घ्या..
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एकापाठोपाठ एक कठोर निर्णय घेतले. सुरुवातीला त्यांनी अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या निर्वासितांची मुस्कटदाबी करून त्यांना देशाबाहेर हाकलून लावलं. त्यानंतर भारत आणि चीनसह जगभरातील अनेक देशांवर अतिरिक्त आयात शुल्क म्हणजेट टॅरिफ लादले. इतक्यावरच न थांबता ट्रम्प यांनी अमेरिकेत काम करणाऱ्या परदेशी नागरिकांच्या व्हिसा नियमांमध्येही मोठे बदल केले. त्यांच्या या भूमिकेमुळे भारत आणि अमेरिकेतील संबंधात दुरावा निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. यादरम्यान हळूहळू दोन्ही देशांमधील संबंध पूर्वपदावर येत असताना ट्रम्प यांनी आणखी एक कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापार संबंध आणखीच ताणले जाण्याची शक्यता आहे.
Published on: Jan 18, 2026 04:16 PM
