Amravati | ग्रामपंचायत निवडणुकीत ईडी लावली तर आश्चर्य वाटून घेऊ नये : यशोमती ठाकूर

Amravati | ग्रामपंचायत निवडणुकीत ईडी लावली तर आश्चर्य वाटून घेऊ नये : यशोमती ठाकूर

| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 3:35 PM

भाजपच्या आरोपानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यावरून राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ईडीला टोला लगावला आहे. (yashomati thakur)

भाजपच्या आरोपानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यावरून राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ईडीला टोला लगावला आहे. आता ग्रामपंचायतीच्या सरपंचालाही ईडीची नोटीस आली तर नवल वाटू नये, असा बोचरी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. अमरावतीत आज सहकार पॅनलने पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला संबोधित करताना यशोमती ठाकूर यांनी थेट ईडीची खिल्ली उडवली आहे. आता उद्या ग्रामपंचायत सरपंचांना ईडीची नोटीस आली तर त्यात नवल काही राहणार नाही, असा चिमटा यशोमती ठाकूर यांनी काढला आहे. या जिल्हा बँक निवडणूकीत सहकार पॅनल विजयी होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच बँकेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.